। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
गणपतीपुळे येथे मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरातील एका तरुणाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. इरफान झाकीरहुसेन जमादार (वय 34, रा. हेरले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इरफान जमादार हा त्याच्या मित्र-मैत्रिणींसोबत गणपतीपुळे येथे आला होते. बुधवारी (दि. 16) ते आरे-वारे मार्गे कोल्हापूरकडे जात असताना भंडारपुळे गावाजवळ कृष्णकुंज हॉटेलजवळील समुद्रकिनारी फोटो काढण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी अचानक आलेल्या मोठ्या लाटेत तो पाण्यात ओढला गेला. स्थानिकानी तातडीने मदत करत त्याला पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.