। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा येथे एका 19 वर्षीय तरुणीने इमारतीच्या 10 व्या मजल्यावरील ‘रिफ्युज एरिया’ मधून उडी मारल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडली असून, ती तिच्या पालकांसोबत याच इमारतीत राहत होती.
मृत तरुणी ही पनवेलमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास करत होती आणि ती तिच्या पालकांसोबत इमारतीच्या 11 व्या मजल्यावर राहत होती. घटनेच्या दिवशी, ती घरी एकटीच होती. तिचे वडील कामावर गेले होते आणि तिची आई साताऱ्याला तिच्या आईला भेटायला गेली होती. दुपारच्या सुमारास इमारतीमधील एका रहिवाशाने तळोजा पोलिसांना या घटनेबद्दल माहिती दिली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तळोजा पोलीस ठाण्याचे पीआय सागर निकम यांनी माहिती दिली की, प्राथमिक दृष्ट्या या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.






