रेवदंडा येथून तरुणी बेपत्ता

। रेवदंडा । प्रतिनिधी ।

रेवदंडा येथून 29 वर्षीय तरुणी राहत्या ब्लॉक मधून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात केली आहे. सिद्धी दिलीप काटवी (29) ही गोरेगाव मुंबई येथे राहते. नोव्हेंबर 2024 पासून ती रेवदंडा येथील ब्लॉक मध्ये राहत होती. तिची मानसिक स्थिती ठीक नव्हती व ती सतत चिडचिड करीत होती. 6 ऑगस्ट 2025 रोजी मुलीचे आई-वडील रेवदंडा येथील ब्लॉकवर मुलीला भेटण्यास आले असता ती सदर ठिकाणी मिळून आली नाही. तसेच तिचा मोबाईल देखील बंद येत असल्याने ती कुठेतरी हरवली असल्याबाबत खात्री झाली. तिचे वडील दिलीप चंद्रकांत काटवी रा.गोरेगाव यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली आहे. मुलीचे वर्णन- रंग निमगोरा, उंची – पाच फूट, बांधा – सडपातळ, पोशाख – मरून रंगाचा पंजाबी ड्रेस, कानात आर्टिफिशियल टॉप, पायात हिलच्या चप्पल आहेत. बेपत्ता तरुणीचा तपास पोलीस हवालदार महेंद्र राठोड हे करीत आहेत.

Exit mobile version