| पाताळगंगा | प्रतिनिधी |
एक दिवसीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन पीपीएल कंपनीच्या समोर असलेले मैदानात करण्यात आले होते. या स्पर्धेत परिसरातील 12 नामवंत संघाांनी सहभाग नोंदविला होता. अतितटीच्या सामन्यात यंगस्टार पोसरी संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तर, द्बितीय क्रमांक आई गावदेवी संघ तळवली व तृतीय क्रमांक भैरवनाथ संघ पौदने पटकाविला. विजेत्या संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम देण्यात आली. तसेच उत्कृष्ट फलंदाज समीर मालकर, गोलंदाज आदित्य मालकर व मालिकावीर शैलेश महाब्दी यांना गौरविण्यात आले. या क्रिकेट सामन्यांचे समावोलोचन प्रकाश पाटील व अशोक मालकर यांनी केले. तसेच, आयोजन हरेश पाटील, निखिल काठावले, कल्पेश काठावले, वैभव भोईर, अजय काठावले, विजय पाटील, सागर काठावले, सुशांत काठावले, प्रतीक काठावले या युवकांने केले होते. या मैत्री चषकासाठी परिसरातील सरपंच, उप सरपंच, पोलीस पाटील ग्रामस्थ यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.







