। खोपोली । वार्ताहर ।
आगामी होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. युवा उद्योजक अर्सला अबूशेठ जळगावकर यांच्या नेतृत्वाखाली शेकापक्षाचे सरचिटणीस आम.जयंत पाटील आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शेकापत जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे शहरात शेकापचे वर्चस्व वाढू लागले आहे.
खालापूर तालुक्याचा कार्यकर्ता मेळावा समर्थ मंगल कार्यालयात रायगड जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्वराज संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा चिटणीस अॅड.आस्वाद पाटील,पनवेल महापालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे आदींच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला होता.यावेळी खोपोलीत शहरातील शास्त्रीनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते अबूशेठ जळगांवकर आणि नगरसेवक निजामुद्दीन जळगांवकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी शेकापक्षात प्रवेश केल्याने शास्त्रीनगर भागात शेकापक्षाची ताकद वाढली आहे.