आपला लाईफ पार्टनर बदलला असून, त्याची काळजी घ्या!

प्रवीण साळुंखे यांचे आवाहन

| नेरळ | प्रतिनिधी |

आरोग्य आणि शरीर आपल्या जीवनातील महत्त्वाचे भाग असून, बदललेल्या लाईस्टाईलमुळे आपल्याला अनेक आजार जडले आहेत. त्यामुळे आपला लाईफ पार्टनर बदलला आहे. आता लाईफ पार्टनर आपली पत्नी नाही, तर आपले शरीर बनले आहे. त्यामुळे शरीराची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन आरोग्य सल्लागार, हेल्थ वेलनेस कोच आणि आरोग्य आंतरराष्ट्रीय स्पीकर प्रवीण साळुंखे यांनी कर्जत येथे केले. कर्जत येथे आरोग्य जनजागृती अभियानांतर्गत कर्जत तालुका आणि गाव निरोगी अभियानाच्या कार्यक्रमात प्रवीण साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात डीएक्सएन प्रसारक अनिल भोसले यांच्या पुढाकाराने आरोग्य जनजागृती अभियानानिमित्त ‘निरोगी शहर, निरोगी गाव’ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रवीण साळुंखे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते प्रवीण साळुंखे यांचे स्वागत केले. यावेळी प्रवीण साळुंखे यांनी स्वास्थ्य क्रांती कशासाठी करायला हवी याचे उत्तर आधी आपण स्वास्थ्य बिघडल्यानंतर शोधतो, पण ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्यासाठी स्वास्थ्य बिघडण्याआधी सर्वांनी चांगले स्वास्थ्य ठेवण्यासाठी नियोजन केले पाहिजे, असे आवाहन प्रवीण साळुंखे यांनी केले.

आपल्या शरीरातील आजारातील कारणे हे डॉक्टरांना शोधण्यासाठी आधी आपण आपले स्वास्थ्य जपावे, असे सांगत त्यांनी आपल्या आयुष्याचे महत्व सर्वांना जाणून घ्यावे, असे आवाहन केले. आपली लाईफ पार्टनर आता बदलली आहे हे स्पष्ट करताना साळुंखे यांनी आपली लाईफ पार्टनर आपली पत्नी नाहीतर तर आता आपले शरीर बनले आहे. त्यामुळे शरीराची काळजी सर्वांनी घेण्याचे आवाहनदेखील साळुंखे यांनी केले. त्यामुळे प्रत्येकाने आपले लाईफ पार्टनर म्हणजे शरीराची निगा राखण्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. कारण आपले शरीर साथ देत असेल आणि ते स्वास्थ देणारे असेल तर आपोआप कुटुंबाचे रक्षक म्हणून जबाबदारी घेवू शकेल आणि त्यासाठी बदललेल्या लाईफ पार्टनर ची काळजी घ्यावी असे आवाहन करतानाच सर्वांनी गोळ्यांचा मारा शरीरावर न करता योग्य फुड्सचे सेवन करावे असे आवाहन देखील प्रवीण साळुंखे यांनी केले.

या स्वास्थ्य आरोग्य शिबिराला मुंबई भांडुप, बदलापूर, कर्जत, घाटकोपर, आळे-फाटा, भिवंडी, ठाणे या भागातील लोकांची उपस्थिती होती. यावेळी इतिहास संशोधक वसंत कोळंबे, माजी नगरसेवक कृष्णा घाडगे, मनोहर थोरवे, उत्तम शेळके, केशव मुने, ज्ञानेश्‍वर भालीवडे, बाळकृष्ण सावंत, नारखेडे, वसंत शिंदे, एम डी बार्शी, प्रवीण पाटील, प्रकाश लाड, राजेश इथापे आदींसह असंख्य लोक उपस्थित होते.

Exit mobile version