पवारांना धमकी देणारा युवक अटकेत

। नाशिक । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना ट्विटवरून दिलेल्या धमकीवर राष्ट्रवादीकडून सायबर सेलमध्ये तक्रार करण्यात आली होती. यानंतर नाशिक पोलिसांनी कारवाई करत संबंधित तरुणाला अटक केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी ही तक्रार दाखल केली होती. शरद पवारांना धमकी देणार्‍या ट्विटर हँडलचा शोध घेवून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. राष्ट्रवादी नेते सुरज चव्हाण यांनी ट्विट करून म्हटले होते की, नथुराम तयार करण्याची फॅक्टरी कुणाची आहे? याची चौकशी झाली पाहिजे, ही मागणी महाराष्ट्र सायबर सेल विभागाकडे केली.

Exit mobile version