तरूणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठण्याजवळील उनाटावाडी (ता.रोहा) येथील जयेश रामजी शिद (वय 23) या तरूणाला मांडवी एक्सप्रेस या रेल्वेची धडक लागल्याने त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर जखमा होऊन त्याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.25) सायंकाळी 7.26 वाजण्याच्या सुमारास आमडोशी गावाच्या हद्दितील रेल्वे ट्रॅकजवळ घडली.

याप्रकरणी रेल्वे पोलिस दलातील अजयकुमार बलविर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघाताची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली आहे. याप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. एम.के. रुईकर हे पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version