। रायगड। वार्ताहर ।
पुण्यातील एका महाविद्यालयामध्ये बीबीए शिक्षण घेत असलेला अद्वैत वर्मा (19) रविवारी सुटी असल्याने त्याच्या सहा मित्रांसह पवना धरण परिसरात फिरायला आला होता. दुपारी सर्वजण पवना धरणात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने अद्वैत बुडाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निधीक्षक किशोर धुमाळ, पवनानगर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी विजय पवार यांनी वन्यजीव रक्षक संस्था आणि शिवदुर्ग मित्र या संस्थेतील स्वयंसेवकांची मदत घेतली. अंधार पडल्यानंतर पथकाने शोधमोहीम सुरु ठेवली. रात्री उशिरा अद्वैतचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.