| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील कलोते ग्रामपंचायत हद्दीमधील कॅप मॅक्सजवळ लाईफ अँड जॉय या रिसॉर्टमधील कामगाराचा कलोते धरणात मंगळवारी (दि.12) सकाळच्या सुमारास बुडून मृत्यू झाला आहे. अभय शिवाजी राऊत (23) रा. माजलगाव, बीड असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभय शिवाजी राऊत हा खालापूरमधील लाईफ अँड जॉय या रिसॉर्टमध्ये कामाला लागून चार दिवस झाले होते. हे हॉटेल कलोते धरणाच्या अगदी कडेला असल्याने अभय राऊत याने जीन्स आणि टी शर्ट घालून त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली असता काही अंतर तो पोहला खरा, मात्र दूरचे असल्याने त्याची दमछाख झाली आणि पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन हेल्फ फाऊंडेशन खोपोली यांना पाचारण करून शोध मोहीम सुरु केली. चार तासाच्या अथक प्रयत्नातून अभय राऊत याचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले असून, या घटनेचा पुढील तपास खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस करीत आहेत.







