| परभणी | वृत्तसंस्था |
विजेचा जोरदार झटका लागल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या सोनपेठ परिसरात घडली आहे. दरम्यान विजेचा झटका बसलेल्या युवकाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांकडून लवकर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे आरोप करत मेऊटच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. किसन मस्के असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
किसन म्हस्के या युवकाला विजेचा जोरदार झटका बसला होता. यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सोनपेठच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, जखमींवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात एक देखील डॉक्टर किंवा इतर सहकारी नसल्याने त्यास वेळेवर उपचार मिळू शकले नाही. यात युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकानी केला आहे.