। पनवेल । वार्ताहर।
कळंबोली येथे एका दुचाकीला अनोळखी वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी वाहन चालकाविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिजा जंग बहादूर शर्मा (33) हा आपल्या दुचाकीने जात होता. शिळफाटा पनवेल हायवे रोडवर मंदिराजवळ ब्रिज सुरू होण्याच्या 50 मीटर अगोदर कळंबोली येथे आला असता अज्ञात वाहनचालकाने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वाहनचालक वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी वाहन चालकाविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपी वाहनचालकांचा शोध घेत आहेत.