अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेलजवळील जंगल कट गव्हाण फाटा येथे अज्ञात वाहनाने स्कुटीला धडक दिली. यात स्कुटीचालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

मयुरेश म्हात्रे (24) रा. उरण असे मृत तरुणाचे नाव आहे. मयुरेश म्हात्रे आपल्या ताब्यातील एक्टीव्हा स्कुटीवरून पनवेल येथील आपल्या राहत्या घरी मुळेखंड येथे जात होते. दरम्यान गव्हाण फाटा येथे आले असता त्यांच्या गाडीला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने ठोकर दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version