। पनवेल । वार्ताहर ।
खारघर रेल्वे स्थानकाजवळ लोकलच्या धडकेत 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली होती. पण मृत्यूपूर्व तयार केलेल्या व्हिडिओत मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पनवेल रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
खारघर बेलापूर रेल्वे स्टेशनदरम्यान राकेश घाची हा तरुण जखमी अवस्थेत सापडला होता. रेल्वे पोलिसांनी त्याला पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर पनवेल रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. पण राकेशच्या मोबाईलमध्ये मृत्यू पूर्वीचा व्हिडिओ सापडल्यानंतर दुकानमालकाने आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा उघड झाले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वडीलांची तक्रार
पनवेल रेल्वे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपी ओमराम पवारने राकेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल केल्याची माहिती पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली.





