वाशी स्थानकात ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

पनवेल-सीएसएमटी मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जयेश मळेकर (41) असे मृत तरुणाचे नाव असून, तो मूळचा मुंबई सेंट्रलचा रहिवासी असून, कामानिमित्त नवी मुंबईत आल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयेश गुरुवारी (दि.6) सायंकाळी वाशी रेल्वे स्थानकातील 4 क्रमांकाच्या फलाटावर मुंबईकडे जाणारी लोकल पकडण्यासाठी आला. तेव्हा ट्रेन सुरू झाल्याचे पाहून तो धावत गेला आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन खाली पडला. या घटनेत त्याच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. उपस्थित प्रवासी आणि रेल्वे कर्मचार्‍यांनी तातडीने त्याला वाशीतील नवी मुंबई मनपा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Exit mobile version