पोलीस निरीक्षकामुळे तरुण व्यसनमुक्त

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

पोलीस निरीक्षकामुळे व्यसनाच्या खोल गर्तेत गेलेला हा तरुण व्यसनातून बाहेर पडला असून, त्याच्या वागण्या बोलण्यातही कमालीची सुधारणा झाली आहे. आता हा तरुण आदर्श जीवनप्रणाली जगत आहे. माणगाव पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी व्यसनाधिन झालेल्या अब्रार ताज याला व्यसनमुक्त करण्यात यश मिळविलेले आहे.

अब्रारच्या अंगी असलेल्या गुणांची कौशल्याची त्यांनी पारख केली व त्याच्या अंधारमय जीवनात प्रकाशाची पहाट आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले. त्याला संपुर्ण पणे आधार देत मार्गदर्शन केले.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. अब्रार ताज आता आपल्या कुटुंबात प्रतिष्ठा व सन्मानाने जगतोय.

अब्रारच्या वडिलांनी व कुटुंबियांनी सांगितले की अब्रार खूप नशेच्या आहारी गेला होता, कुटुंबीय खूप त्रासले होते, इतर वेळी अब्रार चा स्वभाव अत्यंत प्रेमळ मात्र नशेत असल्यावर तो कुणालाही जुमानत नव्हता, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी अब्रार च्या जीवनात खूप परीवर्तन केले, आपल्या मुलातील झालेला सकारात्मक बदल पाहून राजेंद्र पाटील यांचे वडिलांनी आभार मानलेत.

Exit mobile version