अपघातात तरुण जखमी

| पनवेल | वार्ताहर |

यश मोरे हा एक्टिवा (एमएच-43-बीडी-3157) गाडीने खारघर येथून सीबीडी बेलापूरकडे येत असताना रिझर्व बँके समोरील रस्त्यावर पाठीमागून आलेल्या (एमएच-46-झेड-4454) चार चाकी गाडीने धडक दिली. या धडकेत यश गाडीवरून खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला सीबीडी येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या दोन्ही पायांना व उजव्या हाताच्या खांद्याला फ्रॅक्चर झाले आहे. चारचाकी चालक विपिन सिंग रावत (39) खारघर यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version