दुचाकी अपघातात युवक जखमी

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपासवर मळगाव सोनुर्ली तिठा येथे दुचाकीची दिशादर्शक दगडाला धडक बसुन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. साईश सावंत व शुभम सावंत (21) अशी त्यांची नावे असून ते दोघे भाऊ आहेत. गोवा येथून कुडाळ नारुरच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी त्यांना रिक्षातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

Exit mobile version