पेण येथे युवा नेतृत्त्व शिबीर

। पेण । वार्ताहर ।
एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त अंकुर ट्रस्टच्या वतीने पेण येथे युवा नेतृत्त्व शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित युवक-युवतींना एच.आय.व्ही. एड्स आणि लैगिंक शिक्षण याबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मैत्रेयी पाटील म्हणाल्या की, आजार होवून त्यावर इलाज शोधण्यापेक्षा तो होऊ न देणे आवश्यक आहे.
तसेच कोरोनाप्रमाणेच एड्स आटोक्यात आलेला आहे. तो संपलेला नाही किंवा त्यावर कायमचा इलाज नाही. युवा वर्गाला योग्य वेळी लैंगिक शिक्षणाचे मार्गदर्शन न लाभल्याने अनेक समस्या येतात. यामुळे युवा दशतेच याबाबत विचार आणि आवश्यक ती भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या शिबिरात विविध सत्रात चित्रफीत दाखवून उपस्थित युवावर्गात चर्चा घडवून आणली. याप्रसंगी संस्थेच्या प्रमुख डॉ. वैशाली पाटील, राज पाटील आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version