| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर येथून 19 वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी खारघर पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. सहिल माहित शेख असे या युवकाचे नाव असून, तो पनवेल रेल्वे स्टेशन जवळील साई बाबा बिल्डिंगमधील रहिवासी आहे. हा युवक सकाळी खारघर येथील वॉशिंग सेंटर येथून कोणासही काही न सांगता निघून गेला. तेव्हापासून तो परत आलेला नाही. सहिलचा बांधा मध्यम, उंची अंदाजे 5.5 फूट, रंग गोरा, नाक सरळ, केस काळे असून, अंगात पांढऱ्या रंगाचा चेक्स शर्ट व काळ्या रंगाची फॉर्मल पॅन्ट परिधान केलेली होती. संबंधित युवक मतीमंद असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस शिपाई दिलीप चौरे यांच्या मार्फत सुरू आहे. अधिक माहिती मिळाल्यास खारघर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खारघर येथून युवक बेपत्ता
