। छ. संभाजीनगर । प्रतिनिधी ।
पाटोदा तालुक्यातील रायमोहा पोलीस चौकी हद्दीतील दगडवाडी येथे एका मेंढपाळ तरूणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास घडली. दीपक केरा भील्ल (19, मध्यप्रदेश) असे मृत तरूणाचे नाव असून तो आपल्या कुटुंबियांसोबत मेंढ्या चारण्यासाठी या परिसरात आला होता.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, विलास एकनाथ भोसले (52, रा.वैजापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) याने दीपकच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी तागड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या
