| चिरनेर | वार्ताहर |
आरोही क्लासिक चॅम्पियनशिप यांच्या विद्यमाने नागपूर येथे बुधवार, दि. 8 रोजी बॉडी बिल्डींग स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत उरण येथील फिटनेस बंकर्स जिममधील मारुती जयकृष्ण बेहरा हा सिनियर मेन फिजीकमध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याला आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर, विशाल रमेश कोळी उरण-मोरा ज्युनिअर बॉडी बिल्डींग हा कांस्यपदकाचा धनी ठरला. त्याला आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या दोघांचे उरण तालुक्यात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
याप्रसंगी डायटीशन प्रियांका अशोक तांडेल, मिस्टर ऑलम्पिक मंगेश गावडे (मुंबई), पंकज पटेल (मुंबई), रोहित साहू (नागपूर) आदी उपस्थित होते.