| खोपोली | प्रतिनिधी |
भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू राजेश चौहान यांनी 9 नोव्हेंबर रोजी खालापूर तालुक्यातील ग्रामीण केळवली गावाला भेट दिली. यावेळी केळवली गावामध्ये तरुणांनी राजेश चौहान यांचे स्वागत केल्याने चौहान भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. माजी क्रिकेटपटू राजेश चौहान यांनी यावेळी आपले मत मांडताना म्हणाले की, तरुणांनी क्रिकेट सोबत अभ्यासात लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून, ज्यांना क्रिकेटमध्ये करीयर बनवायच्या नसल्यास क्रिकेट छंद म्हणून खेळावे, असे मत चौहान यांनी व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सत्यम पांडे, मडन गावानंग, सुनील दिसले, वैभव दिसले, तानाजी दिसले, पोलीस पाटील शरद दिसले, हनुमत कर्णूक, अंकुश मराडे, जयेश कर्णूक, रवींद्र देशमुख, दिनेश दिसले, समाधान दिसले, धीरज दिसले, कल्पेश दिसले, सागर दिसले, तेजस दिसले, आकाश दिसले आदी प्रमुखांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
राजेश चौहान पुढे बोलताना म्हणाले, ग्रामीण भागातील वातावरण हे क्रिकेटसाठी पोषक असले तरी, काही खेळाडूंना मॅचेस पासून दूर राहावे लागत असल्याने खेळाडूंनी मेहनत घेत स्पर्धा असलेल्या ठिकाणी सहभाग घेत आपला खेळ प्रदर्शित करावा. तर खेळाडूंनी क्रिकेट खेळ न खेलता हॉकी, फुटबॉल, स्विमिंग अथलेटिक्स, सायकलिंग मध्ये चांगला सराव केल्यास भारतीय सैन्यात सामील होऊ शकतो. त्यामुळे खेळाबरोबर शिक्षण खूप महत्त्वाचे असून, सर्वांनी खेळाबरोबर शिक्षणाचे धडे चांगल्या पद्धतीने गिरवत आपले भविष्य घडवावे असे मत भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू राजेश चौहान यांनी व्यक्त केले. तर राजेश चौहान हे 1993 ते 1998 दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे उजव्या हाताचे ऑफ-ब्रेक गोलंदाज होते. त्यांनी 21 कसोटी आणि 35 एकदिवसीय सामने खेळले असून, अनिल कुंबळे आणि वेंकटेश प्रसाद यांच्यासोबत 1990 च्या दशकातील भारतीय फिरकी त्रिकुटाचा भाग होते.







