युवकांनी कौशल्य विकास केंद्राच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा – अरुण उंडे

| पाली | वार्ताहर |
आगामी काळात जिल्ह्यात वाढत्या उद्योग क्षेत्रामुळे रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत. यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामार्फत राबवण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोहा सुधागड चे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांनी केले.

शासनामार्फत जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यापैकी सुधागड तालुक्यातील केंद्र जांभूळपाडा येथे सुरू करण्यात आले आहे.

राज्यातील या केंद्रांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे झाले. यनिमित्ताने सुधागड तालुक्यातील केंद्र जांभूळपाडा येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व युवक यांच्याशी संवाद साधताना उंडे बोलत होते.

यावेळी तहसील सुधागड उत्तम कुंभार, गटविकास अधिकारी लता मोहिते, गट शिक्षणाधिकारी साधुराम बांगारे, पाली औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य, तालुक्यातील अंगणवाडी सेविका ,मदतनीस ,आशा वर्कर, यांचेसह विविध शासकीय विभागाचे अधिकारी तेसेच जांभूळपाडा येथील सु.ए.सो. हायस्कूल चे विद्यार्थी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील युवक युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे आणि मनुष्यबळाला कौशल्यपूर्ण बनविण्यासाठी जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतीमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.

Exit mobile version