तृतीय पंथियांकडून तरुणावर अत्याचार

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| मुंबई | प्रतिनिधी |

लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून एका विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करून खंडणी मागणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. भास्कर औरक्या स्वामी शेट्टी, कावेरी वेलमुर्गन वेदमा निकम, नाझिया गौस शेख ऊर्फ नवाज आणि माही तबरेज खान अशी या आरोपींची नावे असून, हे सर्वजण तृतीयपंथी आहेत. बोरिवली न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.

पीडित तरुण हा 19 वर्षांचा असून, तो कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतो. सध्या तो एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दीड वर्षापूर्वी त्याची आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींनी पीडित मुलाला घरी बोलावून त्याच्यावर लिंग बदलण्यासाठी दबाब आणला, मात्र त्याने त्‍यास नकार दिला होता. त्यानंतर आरोपींनी या मुलाला कोंढून ठेवत त्याला श्वानांसोबत लैंगिक कृत्य करण्यास प्रवृत्त केले व त्याचे व्हिडिओ बनविले. या व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींनी पीडितेकडून पैशांची मागणी करत धमकावले. दरम्यान, हा प्रकार पीडित मुलाने त्याच्या आईला सांगितला होता. त्यामुळे घाबरलेल्या आईने या मुलाला पैसे दिले होते, मात्र त्यानंतरही आरोपी पीडितेकडे पैशांची मागणी सुरू ठेवली. काही दिवसांपूर्वी त्यांनी या मुलाला सुरत येथे नेत त्याचे लिंग बदलून शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर आरोपींनी त्याला घरी कामावर ठेवून घेतले होते; मात्र, होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडित मुलाने तेथून पळ काढत मालवणी पोलिसांत तक्रार दाखल केली.

Exit mobile version