| रोहा | वार्ताहर |
रोहा रेल्वे स्थानकात रविवारी (दि. 6) सकाळी दिवा सावंतवाडी पॅसेंजरमधून पडून तरुण ट्रेन व फलाटमध्ये अडकून जखमी झाला आहे. रोहा तालुका शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की रोहा रेल्वे स्थानकामध्ये दिव्यावरून सावंतवाडी कडे जाणार्या दिवा सावंतवाडी पॅसेंजर मधून एका तरुणाचा पाय घसरून तो रेल्वे व फलाटाच्यामध्ये अडकला. या घटनेची माहिती मिळताच टीम व धाटाव अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले व पुढील उपचाराकरिता रोहा तालुका शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. प्रेम प्रदीप कांबळे ( 25) रा. म्हसळा, जिल्हा रायगड असे तरुणाचे नाव आहे.