| पाली/गोमाशी | वार्ताहर |
रायगड जिल्हा व सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वरदायिनी क्रीडा मंडळ राबगाव यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत नवयुवक खिडकी संघाने बाजी मारली. या स्पर्धेत तालुक्यातील 24 संघाने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील अंतिम लढत नवयुवक खिडकी विरुद्ध म्हसोबा शहापूर या संघात झाली. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी नवयुवक खिडकी हा संघ ठरला.
या संघास रोख रक्कम 25 हजार 1 रु व आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांक मानकरी म्हसोबा शहापूर या संघास रोख रक्कम 15 हजार 1 रु व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक श्री विठ्ठल कोपरपाडा संघास रोख रक्कम 10 हजार 1 रु व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक नवतरुण तळाघर या संघास रोख रक्कम 10 हजार 1 रु व आकर्षक चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले. या स्पर्धेतील मालिकावीर खेळाडू निर्देश डाके यास सायकल, तर उत्कृष्ट चढाईपटू अक्षय पाटील, उत्कृष्ट पक्कड संतोष जाईलकर, पब्लिक हिरो आकाश पाटील या खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.







