15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान स्पर्धा; 6 फेब्रुवारीला रंगणार अंतिम सामना
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयसीसीने 2026 च्या 19 वर्षांखालील पुरुष विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेचा 16 वा हंगाम 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 दरम्यान खेळवण्यात येणार आहे. झिम्बाब्वे आणि नामिबिया या स्पर्धेचे आयोजन करणार असून, अंतिम सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जाणार आहे. 16 संघ सहभागी होणार असून, ज्यामध्ये झिम्बाब्वे आणि नामिबिया पहिल्यांदाच यजमानपद भूषवणार आहेत.
आयसीसीकडून बुधवारी 19 वर्षांखालील पुरुष विश्वचषकाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे स्पर्धेचे आयोजन करणार असून, हे दोन्ही देश संयुक्तपणे जागतिक आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. या स्पर्धेत दोन नवीन संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये टांझानिया जपान या दोन देशांचा समावेश आहे. 2026 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी दोन नवीन संघांची निवड केली गेली आहे. टांझानिया पहिल्यांदाच या मोठ्या स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहे. यापूर्वी 2020 मध्ये खेळलेला जपान देखील दुसऱ्यांदा सहभागी होणार आहे. या दोन्ही संघांच्या प्रवेशामुळे स्पर्धेची व्याप्ती आणि स्पर्धात्मकता वाढणार आहे.
2024 मध्या झालेल्या वर्ल्ड कप प्रमाणेच 2026 मध्येही स्पर्धेचे स्वरुप असणर आहे. सहभागी 16 संघांना चार गटात विभागले जाणार आहे. 23 दिवसात 41 सामने खेळवले जातील. त्यानंतर सुपर सिक्स फेरी होईल. पहिल्या फेरीनंतर चारही गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्समध्ये आल्यानंतर एकूण 12 संघ होती. या 12 संघांची सुपर सिक्समध्ये पुन्हा दोन गटात विभागणी होईल. त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहचतील. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस असणार आहे. 5 वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला ग्रुप ‘ए’मध्ये ठेवण्यात आले आहे. या ग्रुपमध्ये भारतीय संघासहित न्यूझीलँड, बांगलादेश आणि अमेरिकेच्या संघाचा समावेश आहे. या स्पर्धेचा पहिला सामना झिम्बॉब्वेमधील मैदानात भारत आणि अमेरिकेमध्ये होणार आहे. दुसरीकडे ग्रुप ‘बी’मध्ये पाकिस्तान, यजमान झिम्बॉब्वे, इंग्लंड, स्कॉटलँड या संघाचा समावेश आहे. ‘सी’ ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, आयरलँड, जपान आणि श्रीलंकेचा समावेश आहे. ग्रुप ‘डी’ मध्ये तंजानिया, वेस्टइंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे.
उपांत्य फेरीतील सामने
3 आणि 4 फेब्रुवारी आणि अंतिम सामना 6 फेब्रुवारीला होणार आहे. हरारे स्पोर्ट्स क्लब (हरारे), ताकाशिंगा स्पोर्ट्स क्लब (हरारे), क्विन्स स्पोर्ट्स क्लब (बुलवायो), नामिबिया क्रिकेट ग्राऊंड (विंढोक) आणि एचपी ओव्हल (विंढोक) या मैदानांवर या स्पर्धेतील सामने होणार आहेत.
गट विभाग खालीलप्रमाणे
गट अ- भारत, बांगलादेश, अमेरिका, न्यूझीलंड
गट ब- झिम्बाब्वे, पाकिस्तान, इंग्लंड, स्कॉटलंड
गट क- ऑस्ट्रेलिया (गतविजेता), आयर्लंड, जपान, श्रीलंका
गट ड - टांझानिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका
या स्पर्धेचा अंतिम सामना 6 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. गट टप्प्यानंतर, शीर्ष चार संघ बुलावायो येथे होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.







