कामोठ्यातील तरुणांवर चाकूने वार

| पनवेल | प्रतिनिधी |

कामोठे येथील दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूने वार करून जखमी केल्याप्रकरणी तिघांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कामोठे येथील गौरव काकडे (28) व त्याचा मित्र फैजान मुलानी हे दुचाकीवर सेक्टर-6 येथे गेले होते. ते तेथील पान टपरीवर गेले असता त्या ठिकाणी समर्थ मोरे, प्रतीक साठे, आणि आर्यन हे तरूण उभे होते. त्यावेळी समर्थ मोरे हा गौरवच्या जवळ आला आणि त्या दिवशी मला अपशब्द का वापरले, असा जाब विचारला. यावेळी अपशब्द वारले असतील तर माफी मागतो, असे गौरव म्हणाला. तरीदेखील समर्थ मोरेने गौरवला मारण्यासाठी दगड उचलला. त्यानंतर आर्यन याने चाकू काढला आणि गौरवच्या उजव्या हातावर वार केला. यादरम्यान, गौरवचा मित्र फैजान मध्यस्तीसाठी आला असता समर्थ, आर्यन आणि प्रतिक या तिघांनी त्याला कमरेच्या पट्ट्याने आणि लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच, त्याच्या छातीवर व पोटावर चाकूने वार करून जखमी केले आणि तेथून पळ काढला.

Exit mobile version