आध्या सप्लायर्स म्हात्रोळी संघाला धूळ चाटत उपांत्य फेरीत दाखल
| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील नांदाईपाडा मैदानावर सुरू असलेल्या अलिबाग प्रिमियर लीग या क्रिकेट सामन्यांच्या अखेरच्या युवराज इलेव्हन थळ विरूद्ध आध्या सप्लायर्स म्हात्रोळी हा तिसरा सामना पार पडला . या झालेल्या चुरशीच्या सामन्यात दोन्ही संघांनी अतिशय सुंदर अशी खेळी करत सामना हा अतिशय अतितटीचा झाला होता. युवराज इलेव्हन थळ या संघाने ही खेळी १२ धावांनी जिंकली असून हा संघ आता उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.