11 लाखांचे पटकावले बक्षीस, मान्यवरांकडून कौतुक
| पेझारी | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा पेझारी शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धेत पहिली आली आहे. या स्पर्धेअंतर्गत केंद्रस्तरीय कमिटीतर्फे पेझारी शाळेचे मूल्यांकन करण्यात आले. केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यानंतर तालुकास्तरीय मूल्यमापन कमिटीतर्फे मूल्यांकन झाले. या कमिटीमध्ये मंगेश पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी, कृष्णा पिंगळा गटशिक्षणाधिकारी अलिबाग व इतर सदस्य होते. या कमिटीने मूल्यांकन करून तालुकास्तरावर पेझारी शाळेला प्रथम क्रमांक दिला. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आल्यामुळे जिल्हास्तरीय कमिटीने शाळेला भेट देऊन मूल्यमापन केले. कमिटीमध्ये पुनीता गुरव शिक्षणाधिकारी प्राथमिक रा.जि.प. अलिबाग, शेडगे उपशिक्षणाधिकारी, तुपे अधिव्याख्याता डायट पनवेल होते.
कमिटीने मूल्यमापन करून जिल्हास्तरावर शाळेला प्रथम क्रमांक देण्यात आला. शाळेस 11 लाखाचे बक्षीस मिळाले याबद्दल माजी आ. पंडित पाटील, आस्वाद पाटील माजी अध्यक्ष रा.जि.प., चित्रा पाटील माजी सभापती रा.जि.प., भावना पाटील माजी सदस्य रा.जि.प. या मान्यवरांनी शाळेतील सर्व शिक्षक, शाळा विकास समिती अध्यक्ष सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य यांचा सत्कार केला. तसेच, पेझारी गावातील ग्रामस्थ-माजी विद्यार्थी सुधीर पाटील, आशिष पाटील, शिरीष पाटील, सुधाकर पाटील, अविनाश थळे, गोलीपकर, राम पाटील, विनोद पाटील व इतर, पालक, गटशिक्षणाधिकारी पिंगळा, केंद्रप्रमुख विनायक पाटील या सर्व मान्यवरांनी शाळा विकास समिती अध्यक्ष सुरेश म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आरती थळे व सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक नितिष पाटील, सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचे सत्कार करून अभिनंदन केले तसेच, पुढील वाटचालसाठी शुभेच्छा दिल्या.