जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, माजी अध्यक्ष ॲड आस्वाद पाटील यांची दरड ग्रस्त गावाला भेट

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस तथा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विद्यमान आघाडी पक्ष प्रतोद ॲड आस्वाद पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांनी आज दरड ग्रस्त तळीये गावाला भेट दिली.
यावेळी त्यांनी ग्रामस्थांना आधार देत या सकट काळात जिल्हा परिषद पाठीशी आल्याचा दिलासा दिला. ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
यावेळी अध्यक्ष योगिता पारधी आणि आस्वाद पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून बचाव कार्याची माहिती घेवून योग्य त्या सूचना केल्या.

Exit mobile version