जिल्हा परिषदेकडील निधीचा तिढा कायम

। पनवेल । वार्ताहर ।

पालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्या वर्षात मुद्राकं शुल्कापोटी पालिकेत समाविष्ठ ग्रामपंचायतींच्या तिजोरीत जमा झालेली 21 कोटी पेक्षा जास्त रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग झाली. जिल्हापरिषदेकडून ही रक्कम पालिकेकडे वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र, जिल्हा परिषदेकडून या बाबत टाळाटाळ केली जात असून, पालिकेत समाविष्ठ गावातील जिल्हा परिषदेमार्फत चालवण्यात येत असलेल्या शाळांची जवाबदारी पालिकेने घ्यावी. त्यानंतर शाळांच्या भूखंड हस्तातरंना पोटी लागणारी रक्कम वजा करून उरलेली रक्कम पालिकेला देण्याची भूमिका जिल्हापरिषदेने घेतल्याने पालिकेत समाविष्ठ ग्रामपंचायतीच्या तिजोरीत मुद्रांक्षुलका पोटी जमा झालेली 21 कोटी 43 लाखाची रक्कम जिल्हा परिषदेकडे अद्यापही पडून आहे.

पालिकेत समाविष्ठ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांच्या 51 इमारती आहेत. दुरुस्ती अभावी या इमारतींची दुरावस्था झाली आहे. मात्र, या इमारतीचे हस्तातरणं पालिकेकडे झालेले नसल्याने इमारती दुरुस्त करण्यात पालिका हतबल आहे. जिल्हापरिषदेने किमान या शाळा दुरुस्त करण्यासाठी त्यांच्याकडे जमा असलेली रक्कम वापरावी अथवा पालिकेकडे निधी जमा करायचा नसल्यास शासनाकडे तो निधी जमा करावा. जेणेकरून शासनाकडून पालिका तो निधी मिळवेल, अशी भूमिका पालिकेचे तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी त्या वेळी बोलून दाखवली होती.

जि.प. शाळांच्या हस्तातरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. तरीही पालिकेच्या माध्यमातून काही झेडपी शाळांच्या इमारतीची दुरुस्ती पालिकेकडून करण्यात आली असल्याची माहिती पालिका अधिकार्‍यांनी दिली आहे.

Exit mobile version