जि.प.पं.स सदस्यसंख्या वाढीचा अहवाल आयोगाला सादर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत.येत्या आगामी निवडणुकीसाठी रायगड जिल्हा परीषदेची सदस्यसंख्या सातने वाढून 66 वर जाणार आहे. तर पंचायत समिती सदस्यांची संख्या 14 ने वाढून 132 वर पोहोचण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील प्रारूप आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला असून तो गुरुवारी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. रायगड जिल्हा परिषदेची सदस्य संख्या पूर्वी 62 होती त्यानंतर ती कमी होवून 59 झाली. आता पुन्हा ही सदस्यसंख्या सातने वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे गण यांच्या संख्येत वाढ करण्याचा राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. अध्यादेशानुसार मतदारसंघांची फेररचना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या 55 पेक्षा कमी नाही, तर 85 पेक्षा जास्त नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण सदस्य संख्या 66 होणार असून, ज्या पक्ष किंवा गटाकडे किमान 34 इतकी सदस्यसंख्या असेल त्यालाच सत्ता स्थापन करण्याची संधी मिळणार आहे.

Exit mobile version