झुंझार पोयनाड प्रीमियर लीग

। पोयनाड । क्रीडा प्रतिनिधी ।

झुंझार युवक मंडळ पोयनाड संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन मंडळातर्फे केले जाते. या वर्षी झुंझार युवक मंडळाच्यावतीने झुंझार पोयनाड प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. दि.27 व 28 एप्रिल रोजी संपूर्ण पोयनाडकरांसाठी हि स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत एकूण 97 खेळाडूंनी ऑनलाईन फॉर्म भरून नोंदणी करून आपला सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघाला संघमालक व एक आयकॉन खेळाडू देण्यात आला. श्री स्वामी समर्थ ओमसाई फार्म हाऊस (शैलेंद्र गायकवाड, राजेंद्र जाधव, आयकॉन खेळाडु विशाल निषाद), आर.जे रॉयल्स (राज जैन, आयकॉन खेळाडू चैतन्य राऊत) जय मल्हार संघ (विकी कामठे, आयकॉन खेळाडू प्रणय साळवी) पोयनाड सुपर जायंट्स (निहाल चवरकर, आयकॉन खेळाडू पार्थ गावडे), नंदा बिल्डर्स (जय पाटील, आयकॉन खेळाडू मृण्मय पालव), वीर रायगड (शैलेश पाटील, आयकॉन खेळाडू ओम साळवी) अश्या सहा संघांमध्ये झुंझार पोयनाड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. संपूर्ण स्पर्धा पोयनाड व्यापारी असोसिएशनच्या अनेक व्यापारी सदस्यांनी पुरस्कृत केली आहे. प्रत्येक संघातील खेळाडूंना रंगीत कपडे मंडळातर्फे देण्यात येणार आहेत.

स्पर्धेच्या अगोदर सर्व नोंदणीकृत खेळाडूंचे लिलाव (ऑक्शन) करण्यात आले. सर्व खेळाडूंना विविध संघांमध्ये लिलावातून विभागून देण्यात आले. या सोहळ्यासाठी अन्वर बुराण, किशोर तावडे, दिपक साळवी, नंदकिशोर चवरकर, अजय टेमकर, भूषण चवरकर, अजित चवरकर, महेश अग्रवाल, प्रवीण वावेकर, पंकज चवरकर, राजेंद्र जाधव यांच्यासह पोयनाड व्यापारी असोसिएशनचे सदस्य, ग्रामस्थ आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version