झुंझार युवक मंडळ पोयनाड क्रिकेट स्पर्धा

प्रतीक क्रिकेट अकॅडमी पनवेल विजयी

| पोयनाड | प्रतिनिधी|

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै.मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक ज्युनियर वयोगटातील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीच्या सामन्यात प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघांनी करण क्रिकेट अकॅडमी कामोठे संघावर विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.
नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या प्रतीक क्रिकेट अकॅडमी संघांनी 40 षटकांच्या समाप्ती नंतर 9 गडी बाद 295 धावा फलकावर लावल्या, सलामीवीर वेदांत बोंबले यांनी अवघ्या 61 चेंडूंचा सामना करत 10 चौकरांच्या सहाय्याने 70 धावा काढल्या. मधल्या फळीत त्याला आर्य म्हात्रे यांनी 33 तर श्रेय पाटील यांनी सर्वाधिक 59 चेंडूंमध्ये 10 चौकार व एक षटकार ठोकत 77 धावा ठोकल्या. शायन सोबीन यांनी 29 धावांचे योगदान दिले.

करण क्रिकेट अकॅडमी कडून पियुष दांडेकर यांनी 3, आर्यन पांडे व आयुष शिर्के यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. प्रतिउत्तरात करण क्रिकेट अकॅडमी संघाच्या पियुष दांडेकर आणि आयुष शिर्के वगळता कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. संपूर्ण संघ 74 धावसंखेवर बाद झाला प्रतीक क्रिकेट अकॅडमी कडून ओंकार राक्षिकर, पार्थ जंगम यांनी प्रत्येकी 3 तर विघ्नेश पाटील यांनी 2 फलंदाज बाद केले.

दमदार फलंदाजी करणाऱ्या श्रेय पाटील याला सामनावीर, पियुष दांडेकर स्टार प्रतिस्पर्धी खेळाडु, इमॅर्जिंग प्लेयर वेदांत बोंबले, रिषभ बिश्वास, वेदश्री शेळके, ओंकार राक्षिकर आणि आयुष शिर्के यांना उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून निवेदिता पाटील, इंदू म्हात्रे, सुप्रिया राक्षिकर,अमोल शितोळे, संदिप जोशी, समीर पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version