| अलिबाग । प्रतिनिधी ।
पोयनाड येथील झुंझार युवक मंडळाने आयोजित केलेल्या कै. अँड. शिरीष पाटील स्मृतीचषक ज्युनियर गटाच्या एकदिवसीय 40 षटकांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन रविवारी जिल्ह्याचे सरकारी वकील अँड. भूषण साळवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलताना झुंझार युवक मंडळाचे सुसज्ज मैदान हे जिल्ह्यातील युवा खेळाडूंना न्याय देणारे ठरणारे असल्याचे सांगितले.
अँड. शिरीष पाटील स्मृतीचषक हि एकदिवसीय 40 षटकांची लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा जिल्ह्यातील युवा खेळाडूंसाठी पर्वणीच असणार आहे. टी-20 फॉरमॅट सर्वत्र सुरू असतांना एकदिवसीय सामने आयोजित केल्याने खेळाडूंचे कौशल्य, प्रतिभा व धैर्य पहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील नामवंत क्लब, अकॅडमी, असोसिएशने स्पर्धेत सहभाग घेतला आहे. प्रथम लिग व नंतर बाद फेरी नुसार स्पर्धा खेळली जाणार असून स्पर्धा एक महिना चालणार आहे.
या कार्यक्रम प्रसंगी जयंत नाईक, राजेश पाटील, डॉ.राजाराम हुलवान, अँड. महेश म्हात्रे, अँड. जाई पाटील, भूषण चवरकर, किशोर जैन, सचिन खैनार, सुहास हिरवे, अन्वर बुराण, किशोर तावडे, अजय टेमकर, सुजित साळवी, संतोष चवरकर, योगेश चवरकर, राजेंद्र जाधव, अँड.पंकज पंडित, पंकज चवरकर, संदीप जोशी, संकेश ढोळे, आदेश नाईक सह पोयनाड विभागातील क्रिकेटप्रेमी लोकं उपस्थित होते.






