एकाचा मृत्यू तर 129 कोरोनामुक्त
अलिबाग तहसीलदार यांची माहिती
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मंगळवारी 15 जून रोजी अलिबाग तालुक्यात 127 नव्या रुग्णांची नोंद झाली असून रुग्ण उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 129 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 हजार 898 झाली आहे. यापैकी 430 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 13 हजार 372 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 096 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.