नागरिकांमध्ये भीती
। पेण । वार्ताहर ।
गेल्या 15 दिवसापूर्वी बेनवले मध्ये कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला होता. प्रत्येक घरामागे सरासरीने 1 रूग्ण अशी रूग्ण संख्या होती. मात्र आरोग्य यंत्रणेने व्यवस्थित काम करून व स्थानिक जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, सरपंच विवेक पाटील यांनी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळून बेनवले गावचा कोरोना संसर्ग नियंत्रणाखाली आला.
परंतु वढाव गावात अचानक कोरोना संसर्गाने आतापर्यंत 4 जणांचा बळी देखील घेतला आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग अटोक्यात येण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रण, पोलीस रुग्ण संख्या वाढू नये म्हणून प्रयत्न करीत आहेत. गुरुवारी आरोग्य यंत्रणेसह जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरिओम), वाशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. मनिषा जुईकर, सरपंच पुजा पाटील, कृषिउत्पन्न बाजार समितीचे संदेश ठाकूर, सुजित पाटील, आरोग्य सहाय्यक गणेश म्हात्रे, दिपक म्हात्रे, आशासेविका कविता पाटील, ग्रामसेविका चेतना पाटील, प्रकाश माळी, नगरसेवक संतोष पाटील आदींनी कोरोना संसर्ग बांधित रुग्णांच्या नातेवाईकांना भेट देउन धीर दिला.
जिल्हा परिषद सदस्य हरिओम यांनी सर्व ग्रामस्थांना आवाहन केल आहे की आरोग्य खात्याने जे नियम घालून दिले आहेत, त्यांचा पूर्णतः पालन करा आणि ज्यांना कोरोना संसर्गामुळे जास्तीचा त्रास होतोय असे वाटल्यास तालुका आरोग्य अधिकारी अथवा माझ्याशी संपर्क करा असे आवाहन त्यांनी केले आहे.