अमोल नाईक
संघर्षातूनच निर्मिती झालेल्या शेतकरी कामगार पक्षाचा आज वर्धापन दिन.शेतकरी,कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज असलेल्या शेकापने नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताचाच विचार केला आहे.संकटातही मग शेकापने शेतकरी,कष्टकरी,सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे.ही आधार देण्याची परंपरा शेकापच्या नव्या पिढीतही ठासून भरलेली आहे.त्यामुळे गेल्या वर्ष,दीड वर्षापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या साथीतही शेकापने सर्वसामान्यांना दिलासा देण्याबरोबरच मुलभूत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे.गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळातही वादळग्रस्तांच्या मदतीसाठी शेकाप धावून गेला होता.नुकत्याच आलेल्या महाड,पोलादपूर जलप्रलयातही शेकापने सामाजिक बांधिलकी जोपासत पूरग्रस्तांना मोफत अन्नधान्यांसह कपडे,जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करीत आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहोत हे कृतीने दाखवून दिले आहे.
शेकाप महिला आघाडी प्रमुख, अलिबाग नगरपरिषद नगरसेविका, सीएफटीआयच्या प्रमुख, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह म्हणून विविध भूमिका अत्यंत समर्थपणे सांभाळणार्या चित्रलेखा पाटील कोरोंना आपत्ती, त्या मागोमाग आलेल्या निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळाच्या आणि पुन्हा कोरोंना आपत्ती आपल्या सामाजिक बांधीलकीतून जनसामान्या करिता सक्रिय कार्यरत राहिल्या.
पाटील कुटुंबाचा सामाजिक बांधीलकीचा वारसापूढे नेत असताना या दोन्ही आपत्तीत त्यांनी केलेले काम अनन्यसाधारण असेच आहे. कोरोना या महाभयंकर रोगापासून बचावासाठी अलिबाग, रोहा, मुरुड आणि पेण विभागात निर्जंतुकीकरण करण्यासाठी मोफत 200 फ्यूमिगेशन पंप आणि 2500 लिटर फ्यूमिगेशन लिक्विडचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे सर्वांचे आर्थिक चक्र बिघडले त्यामुळे अलिबाग, रोहा, मुरुड तालुक्यातील ग्रामिण भागात जवळपास 2 लाख गरजू बांधवांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. उदा. यामध्ये 2000 हून अधिक नाभिक समाज, रिक्षा चालक, मिनिडोअर चालक आणि मालकांना सुद्धा अन्नधान्य वाटप करण्यात आले. आरोग्य केंद्र आणि आरोग्य सेविका, आशा ताई, कोविड योद्धा यांना जवळपास 500 पीपीई किट आणि सिव्हिल हॉस्पिटल मध्ये अन्नदान करण्यात आले. मुंबईचे चाकरमानी पायी चालत आपल्या मुळ गावी अलिबाग, रोहा, मुरुड येत होते, त्यांचे होणारे अपघात आणि वेदना बघून खारपाडा ते अलिबाग अशी मोफत बस सुविधा उपलब्ध करण्यात आली. चक्रीवादळामुळे भरपूर घरांचे नुकसान झाले यामध्ये व्यक्तीगत आर्थिक मदत तर जवळपास 13 आदिवासी वाड्यांना पत्रे वाटप करण्यात आले. यामध्ये सागरगड माची, होंडावाडी, सत्यवाडी आणि इतर आदिवासी वाडी आणि सुडकोळी आणि इतर गावांतील गरजूंना पत्रे वाटप करण्यात आले. कोरोंनाच्या काळात रक्ताचा तुटवडा पडत असल्याने स्वत: रक्तदान करून, पीएनपी एज्युकेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिर राबवून जनजागृती केली.
चक्रीवादळच्या काळात लाईटचे पोल, घरावरील पत्रे, कौले, मोठ मोठी झाडे उन्मळून पडली, आणि विद्युत पुरवठा खंडित होऊन, दळणवळणाचे सर्व मार्ग बंद झाले अशा प्रसंगी पोलिस यंत्रणा, चडएइ ऑफिसर्स, प्रशासनाच्या यांच्या संपर्कात राहून परिस्थिति पूर्ववत होण्यास मोलाची मदत, तसेच स्थानिक कार्यकर्त्यांना पोलिस यंत्रणा आणि महावितरण यांना पोल उभे करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आणि अत्यावश्यक ठिकाणी जनरेटर पुरविण्यात आले.
सुडकोली ग्रामपंचायत हद्दीत होमिओपेथिक असेरिक अल्बम 30 च्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामिण भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली अशा वेळी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले.
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची गावोगावी जाऊन पाहणी केली आणि ग्रामस्थांनी राजकारण न करता एकमेकास सहकार्य करून ग्रामस्थांना आणि प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन सुद्धा केले. कोरोनाच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेने 50,000 लोकांना खिचडी वाटप करण्यात आली.
कोरोना प्रादुर्भाव काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून चित्रलेखाताई पाटील यांच्या मार्फत जिल्हा रुग्णालयाला व्हेंटीलेटर भेट देण्यात आले. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू झाले परंतू अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाकरिता इंटरनेट, स्मार्टफोन नव्हते. अशा 700 हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना टॅबचे ( स्मार्टफोन ) वाटप करण्यात आले. आणि थख-ऋख ची सुविधा देण्यात आली.
2020 वर्ष जनतेने कसे बसे हालाकीचे जीवन जगत काढले आणि पुन्हा 2021 मध्ये कोरोंनाने डोके वर काढले. अलिबाग तालुक्यात त्याच प्रमाणे रायगड जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली प्रशासनाला सहकार्याच्या भूमिकेतून आणि आपल्या अलिबाग आणि इतर तालुक्यांना मदत म्हणून रोहा, मुरुड, माणगाव, पाली, खोपोली – खालापूर डेडिकेटेड कोवीड हॅास्पिटलसाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, 30 बेड, ऑक्सिमिटर, इन्फ्रारेड टेंम्परेचर गन ह्या सुविधा इतर तालुक्यांना सुद्धा पुरविण्यात आल्या. अलिबाग तालुक्यात तोडकरी हॉस्पिटल येथे मोफत सेवा देणारे 50 बेड्सचे सुसज्ज कोव्हिड केअर सेंटर त्याच प्रमाणे आरसीएफ कुरुळ येथील विलगीकरण सेंटरला 50 बेड्स आणि ऑक्सिजन पुरविण्यात आले. त्याच प्रमाणे सर्व रुग्ण आणि नातेवाईकांना दर्जेदार पौष्टिक अशा मोफत भोजनाची व्यवस्था आणि गरीबा गरजूंना सुद्धा भोजणाचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 5 पेडियाट्रिक आयसीयू बेड्स तसेच 10 प्रौढांसाठी असे 15 आयसीयू बेड्स देण्यात आले आहेत. रायगडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच मोबाईल एक्सरे मशीन देण्यात आली आहे जी रूग्णाच्या जागेवर एक्सरे घेऊ शकते.
आमदार र् जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रामराज विभागातील जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका भेट देण्यात आली.
तसेच नुकताच रायगड जिल्ह्यातील महाड येथे महापूर आला, आपले लोक अस्मानी संकटात सापडलेले आहेत, महापूराणे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले तर काहींना जीव गमवावा लागला आहे. त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. पूरग्रस्त बांधवांसाठी सामाजिक बांधिलकीने एक हात मदतीचा या भावनेने त्वरित स्वत: उपस्थित राहून 25000 किलो धान्य तसेच कपडे, मेणबत्या व इतर गृहपयोगी वस्तू देण्यात आल्या त्याच प्रमाणे अलिबाग मधील ज्या संस्थांना महाड येथे मदत द्यायची आहे अशांना पीएनपीच्या बसेस मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. आणि महाडच्या पूरग्रस्त बांधवांना शेकापच्या वतीने अजून देखील मदत दिली जाणार आहे, तसेच रायगडच्या जनतेला सढळ हाताने मदत करण्याचे शेकापच्या वतीने आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे.











