अॅड. आस्वाद पाटील व नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
झणझणीत, तर्रीबाज ठसक्यासाठी ओळखली जाणारी मिसळ म्हणजे कोल्हापुरी मिसळ. या मिसळचा ठसका अलिबागकरांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. अलिबागमधील ब्राह्मण आळी येथे नादखुळा मिसळ सुरु करण्यात आले आहे. या हॉटेलचे उद्घाटन शेकापेच जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील आणि अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते सोमवार, दि. 1 ऑगस्ट रोजी करण्यात आले.
नादखुळा या हॉटेलची स्पेशालिटी कोल्हापुरी मिसळ तर आहेच; पण येथे साऊथ इंडियन पदार्थ, चाट फूडदेखील मिळणार आहे. या उद्घाटनप्रसंगी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, नगरसेविका वृषाली ठोसर उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांनी तेथील प्रसिद्ध मिसळ पावचा आस्वाद घेतला.
या हॉटलेमध्ये कोव्हिडदृष्ट्या सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. नादखुळा हॉटलेची होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध असल्याचे मालक पूनम पालवे यांनी सांगितले. हे हॉटेल अलिबाग येथील सावित्री पर्ल बिल्डींग शॉप, नं. 11/12 ब्राह्मण आळी येथे सुरु करण्यात आले आहे.