I टोकियो I वृत्तसंस्था I
ऑलिम्पिकमध्ये अर्जेंटिनाला पराभूत करुन कांस्यपदकाच्या आशा उंचावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. रंगतदार सामन्यात ग्रेट ब्रिटनने भारताचा 4-3 असा पराभव केला.
या पराभवामुळे महिला हॉकी संघाचे कांस्यपदकाचे स्वप्न भंगले. दुसरीकडे कुस्तीपटू बजरंग पुनियालासुद्धा सेमीफायनलमध्ये अझरबैजानच्या हाजी अलीवकडून 12-5 ने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे बजरंगचा ‘गोल्डन चान्स’ हुकला असून, आता कांस्यपदकासाठी लढत होणार आहे. महिला हॉकी असो वा कुस्तीपटू असो, त्यांनी आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आले. त्यामुळे पदक जिंकता आले नसले तरी भारतीयांचा मने मात्र जिंकली आहेत.