। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण शहरातील काविळतळी येथे वाशिष्ठी कृषक सहकारी संस्था अंतर्गत 21 गावे येतात. त्या गावातील शेतकर्यांना गेली 7 ते 8 दिवस झाले खत उपलब्ध होत नाही. याठिकाणी दररोज शेतकरी येतात, पण खत उपलब्ध होत नाही. आता वेळेत खत मिळाले नाही तर शेती करून काहीही उपयोग होणार नाही.यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते यामुळे सोमवारी 21 गावातील 50 ते 60 शेतकरी याठिकाणी येऊन वाद घालून गेले. ही बाब उमेश खताते यांना समजताच थेट सदर संस्था गाठली.सोबत भय्या कदम,प्रतिक शिंदे,राहुल भोसले,शुभम चिपळूनणकर,निलेश शिगवण आदि शिवसैनिक व 15 ते 20 शेतकरी सोबत घेऊन दादा बैकर यांची भेट सदर विषयावर सविस्तर चर्चा केली असता सदर संस्थाने 250 टन खताची आँर्डर देलेली असतांना आता पर्यात फक्त 45 टन खत उपलब्ध झालेले आहे.
खत उपलब्ध होत नाही तरी वरिष्ठाच्या कानावर घालत सदर विषय मार्गा लावता येईल असे चेअरमन बैकर यांनी खताते यांना सांगितले. खताते यांनी थेट खासदार विनायक राऊत व आमदार भास्कर जाधव यांच्याकडे फोन करून विषय कळविला.त्यावेळी राउत यांनी लगेच कृषीमंत्री दादा भूसे व आरसीएफ या खत कंपनीचे प्रवीण शहाकर यांच्या जवळ संपर्क करुन सदर संस्थेला आँर्डर नुसार खत उपलब्ध देण्याचे आश्वासन दिले.यामुळे चिपळूण मधील शेतकर्यांना मागणीनुसार खत मिळण्यास मदत होणार असल्याचे खताते यांनी सांगितले.