। खेड । प्रतिनिधी ।
खेेेड शहराला जगबुडी नदी पात्र आणि लाभलेले अन्य नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे. त्यातच मुंबई गोवा महामार्गावरील होणारे चौपदरीकरण, देवण येथील नारंगी नदीवर झालेला पुल तसेच आ रामदास कदम यांच्या सहकार्यातून शहराच्या मधून वाहणार्या जगबुडी नदी पात्रात बंदरावर बोट हाऊस, बोटींग आणि मगरीच्या दर्शनातून साकार होणारे क्रॉकोडाईल पार्क हे शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा आणि सुंदर खेड स्वच्छ खेडच्या संकल्पनेत भर टाकणारा. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार्या प्रकल्पाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. योगेश कदम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे एक कोटीचा निधी मंजूर करून. या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात करण्यास हिरवा कंदील दिला. बोट हाऊस, बोटींग आणि क्रॉकोडाईल पार्क परदेशी पर्यटक या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतील. पर्यटक आणि पर्यटनातून शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. विकासाचा अनुशेष भरून निघण्यास मदत होईल. न. पा.च्या तिजोरीत भर पडेल असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.