वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे नाराजी
। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील राजकीय सुप्त संघर्ष परत एकदा चर्चेचा विषय झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दोन दिवस मराठवाड्यातील परभणी,हिंगोली नांदेड या जिल्ह्याच्या दौर्यावर आहे. दरम्यान यावेळी तिन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र अनुपस्थित राहणार आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आजपासून नांदेड-परभणी- हिंगोली या जिल्ह्यात जाणार आहेत. अल्पसंख्यांक समाजाच्या विभागातील वसतिगृहाचे उद्घाटन तसेच जिल्हाधिकार्यांना समवेत आढावा बैठक घेणार आहेत. राज्यपाल यांचा राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीत लेख कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालांच्या वाढत्या राजकीय हस्तक्षेपाचा विषयी नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
मात्र वारंवार राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री असा सुप्त संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. पुण्यातल्या णपश्रेलज्ञ बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती राज्यपाल यांनी पूर्वनियोजित दौर्यात कोणताही बदल न करता आधीची भूमिका ठाम ठेवल्यानं पुढील काळात परत एकदा महाविकास आघाडी आणि राज्यपाल असा संघर्ष वाढेल असं म्हटलं जातं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील पालकमंत्री देखील राज्यपाल दौर्यादरम्यान अनुपस्थित राहणार असल्याने महाविकास आघाडीनं योग्य ते सूचक संकेत दिल्याचे देखील म्हटले जातं आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता पालकमंत्री यांचे पूर्व नियोजित दौरे असतील. त्यामुळे पालक मंत्री राज्यपाल महोदयांच्या दौर्यात नसतील. तसंच दुसरीकडे राज्यपाल यांना महाविकास आघाडीच्या वतीने समज दिला असून पुढील कार्यपद्धत बदलतील अशी अपेक्षा देखील मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.