टेकऑफनंतर विमान बेचिराख
| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
गुजरातच्या अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानी नगर परिसरात गुरुवारी (दि. 12) एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या बोईंग 787 ड्रिमलायनर विमानाला भीषण अपघात झाला. टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर क्षणार्धात त्याने पेट घेतला. त्यामुळे परिसरात धुराचे लोट आणि मृतांचा खच दिसून आला. या अपघातात 242 जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने काळजाचा अक्षरशः थरकाप उडाला.
अहमदाबाद स्थित आंतरराष्ट्रीय विमानतळावुरन लंडनच दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे एक प्रवासी विमान दुपारी 1.40च्या सुमारास कोसळले. या विमानातून तब्बल 242 प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर असल्याची माहिती आहे. विमानातील एकूण 242 प्रवाशांमध्ये, 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटिश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर धाव घेतली आहे. तर, जवळील रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. या दुर्घटनेनं अवघा देश शोकसागरात बुडाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला. या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर नागरिकांनीही आपली भावना व्यक्त करत मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण देश या दु:खद प्रसंगात एकत्र उभा आहे आणि सर्व स्तरावरून मदतीचे हात पुढे येत आहेत. प्रशासनाकडून अपघाताच्या सखोल चौकशीचे आश्वासन देण्यात आले आहे.
अहमदाबादमध्ये तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळलं आहे. एअर इंडियाच्या ह्या विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र, दुपारी 1.31 वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान खाली कोसळलं. या विमानातील 242 प्रवाशांमध्ये 12 क्रू मेंबर, 2 नवजात बालके, 11 लहान मुले, 217 प्रौढ प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये, 169 भारतीय, 53 ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा एक नागरिक होता. त्यामुळे, या दुर्घटनेनंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनीही ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. विमानातील 12 क्रू मेंबर्सपैकी 1 क्रू मेंबर महाराष्ट्राची नागरिक होती.
तातडीच्या मदतीसाठी संपर्क -
नागरी उड्डाण मंत्रालयाने मदतीसाठी संपर्क क्रमांक जारी केला आहे. 011-24610843/9650391859
कोणत्या देशाचे किती प्रवासी?
एअर इंडियाच्या माहितीनुसार, बोइंग 787-8 विमानाने दुपारी 1.38 वाजता टेकऑफ केले होते. यात 242 प्रवासी होते, ज्यामध्ये 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी होते. यापैकी 169 प्रवासी भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
हातगाड्यांचा वापर
विमान कोसळल्यानंतर अपघातग्रस्तांना उपचारांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले जात होते. तसेच, मृहदेह शवविच्छेदनासाठी आणले जात होते. रुग्णवाहिकांच्या कमतरतेमुळे मृतदेह हातगाड्यांवरदेखील आणण्यात आले. रुग्णालयात ओ-निगेटिव्ह रक्ताचा तुटवडा असून, रुग्णालयाने रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
अहमदाबादमधील ही दुर्घटना अत्यंत दुःखदायक आहे. या घटनेमुळे मी हादरलो आहे. शब्दात सांगता न येणारे हे दुःख आहे. या दुःखाच्या क्षणी मी सर्व बाधित आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहे. केंद्रातील मंत्री आणि स्थानिक प्रशासनाशी मी सातत्याने संपर्कात आहे. मदत आणि बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आले आहे.
नरेंद्र मोदी,
पंतप्रधान