| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
या विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावांची यादीत 12 व्या नंबरवर विजय रमणिकलाल रुपाणी असं नाव आहे. 2 डी हा त्यांचा सीट नंबर होता. त्यांचा विमानाचा बोर्डिंग पास व विमानात बसल्यानंतरचा एक फोटो समोर आला आहे. त्यामुळे विजय रुपाणी देखील या विमानात होते याची प्रसारमाध्यमांनी पुष्टी केली आहे. ते गुजरातचे 16 मे मुख्यमंत्री होते. त्यांनी 5 वर्षे 37 दिवस या राज्याचा कारभार संभाळला. आनंदीबेन पटेल यांनी गुजरात्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर 7 ऑगस्ट 2016 रोजी ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले.