म्हाडानं (Mhada) मुंबईतील 21 धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. ज्या इमारती जीर्ण (cessed buildings) झालेल्या आहेत. तसंच या पावसाळ्यात त्या कोसळण्याची (Risk of collapse during the upcoming monsoon) शक्यता आहे, अशा इमारतींचा यात समावेश आहे. या यादीत काळा घोडा येथील ऐतिहासिक एस्प्लानेड मेनशचाही समावेश आहे. तसंच बाबुला टँक, मुंबादेवी, मस्जिद, व्ही.पी. रोड, सोनापूर, भोईवाडा आणि उमरखडीतील काही इतर इमारती अतिधोकादायक इमारती म्हणून म्हाडानं जाहीर केलं आहे.
वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन म्हाडानं ही माहिती दिली. मुंबई दुरुस्ती व पुर्नरचना मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी सांगितलं की, म्हाडानं मे आणि जून या महिन्याच्या दरम्यान इमारतींचं सर्वेक्षण केलं होतं. त्यानुसार त्यात 21 इमारती अतिधोकादायक असल्याचं निर्देशनास आलं.