| मुंबई | वृत्तसंस्था |
ज्युनियर विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या बिपाशाने 76 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. 50 किलो गटात सिरनला मात्र उपांत्य फेरीत पराभव झाला. उफा (रशिया) येथे ही स्पर्धा सुरू आहे. मुलांमध्ये रवींदरला रौप्य तर यशला ब्राँझपदक मिळाले. बिपाशाने सुवर्णपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या केली वॉल्करचा पराभव केला. उपांत्य सामन्यात बिपाशाने मंगोलियाच्या ओदबेग उल्धिबतवर 9-4 अशी मात केली होती.
सिरनकडूनही भारताला मोठ्या आशा होत्या; परंतु उपांत्य सामन्यात तिचा अमेरिकेच्या इमेली शिलसनकडून 0-10 अशी एकतर्फी हार झाली. 61 किलोच्या अंतिम सामन्यात भारताचा रवींदर इराणच्या रेहमान अमोझाधाकलिलीकडून 3-9 असे पराभूत झाला. तर ब्राँझ पदकाच्या लढतीत यशने किरगिस्तानच्या स्ताकूल उलू याच्यावर 12-6 अशी मात केली. पृथ्वीराज पाटीलने 92 किलो गटात रशियाच्या इवान किरिलोवचा 2-1 असा पराभूत करून ब्राँझपदक जिंकले.







