वाहनचालकांना नाहक त्रास
। महाड । प्रतिनिधी ।
महाड गांधारी नाका येथील पुलाची खूप मोठी दुरवस्था झाली असून पूर्ण पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पहावयास मिळत आहे. त्यामुळे येथे ये-जा करण्यार्या वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक वर्षांपासून हा पुल अत्यंत वाईट अवस्थेत आहे. या पुलावर खड्डे आणि सळ्या दिसत आहेत. हा पुल अखेरची घटका मोजत आहे. या पुलावर शाळेत जाणारी लहान मुले व रस्त्यावर चालणारे वाहनचालक यांची नेहमीच रहदारी असणारा हा रस्ता आहे. त्यामुळेच वाहनचालक यांना या रस्त्यावरुन जाताना खुप त्रास होतो. अनेक वर्षांपासून या रस्त्यावर कोणीच लक्ष घालत नाही. त्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालुन या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरीक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.